आमची यशोगाथा
1. गावाविषयी माहिती
कौलाळे हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ९९% आदिवासी लोकवस्ती असलेले प्रगतशील गाव आहे. कौळाले गाव येथे पांडव कालीन पुरातन शिव मंदीर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३८६४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ८, अंगणवाडी केंद्रे ११ व ३ समाज मंदीर आहेत.
2. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, भात, नाचली, वरई, उडीद, तुर ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
3. कौलाळे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कासटवाडी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.
4. ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व १२ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
2. भौगोलिक स्थान
कौलाळे हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 12 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. ग्रामपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ २१४९.९७ हे आर असून, लागवड क्षेत्र १५३८.०२ हे आर आहे. ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण 848 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 3864 आहे. त्यामध्ये 1903 पुरुष व 1961 महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत कौलाळे हद्दीत 3 महसुली गावे व १२ पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून 12 km अंतरापर्यंत वसलेले आहेत.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच शिरसगाव (काळशेती) गावालगत धरण आहे. या धरणामध्ये मुबलक प्रमाणात बारमाही साठा असल्यामुळे बारमाही पाणी वाहत असते, पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी, तसेच शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. या धरणाच्या वाहत्या पाण्यामुळे फसणपाडा गावा शेजारी असलेल्या काळमांडवी धबधब्यावर वर्षभर पर्यटक येत असतात, कौलाळे गाव येथेल हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १८°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
3. लोकजीवन
कौलाळे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून मिरची,काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि कौलाळे गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कौलाळे लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
4. संस्कृती व परंपरा
कौळाले गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच कौलाळे गाव येथे पुरातन शिवमंदीर हे जागृत देवस्थान असून येथे महाशिवरात्री निमीत्त ७ दिवस अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन गेल्या अनेक वर्षा पासून केले जाते, या ७ दिवसामध्ये प्रवचन, कीर्तन, जागर भजन, व पहाटे काकडा भजन केले जाते. या सप्ताहामध्ये एकूण 12 गाव/पाड्यांचा सहभाग असतो व सातही दिवसामध्ये ग्रामस्थ तसेच दाते अन्नदान करतात. महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शना करीता येत राहतात व रोजच येथे शिव भक्तांची वर्दळ असते, सदर शिव मंदीर पुरातन आहे व सदर शिवालयाच्या सभोवती भल्या मोठ्या दगडांचा कोट आजही पहावयास मिळतो. ग्रामपंचायत कौलाळे गाव पैकी टोकरखांड येथे नवरात्र उत्सवा निमीत्त दुर्गा मातेची स्थापना केली,
नवरात्र उत्सवामध्ये गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
5. प्रेक्षणीय स्थळे:-
6. कौलाळेश्वर शिव मंदीर – कौळाले गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला भव्य स्वरूपामध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7. शिरसगाव (काळशेती) धरण – या धरणामध्ये मुबलक प्रमाणात बारमाही साठा असल्यामुळे नदी बारमाही पाणी वाहत असते, पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी, तसेच शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो.
8 काळमांडवी धबधबा- ग्रामपंचायत हद्दी पैकी फणसपाडा शेजारी काळमांडवी धबधबा प्रसिद्ध असून वर्षभर पर्यटक येत असतात..
9. जवळची गावे
ग्रामपंचायत कौलाळे हद्दिच्या लागत नांदगाव, न्याहाळे खुर्द, केळघर, पोन्धीचापाडा, झाप धोंडपाडा. आसपासची प्रमुख गावे आहेत.