"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.  गावाविषयी माहिती

कौलाळे  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ९९% आदिवासी लोकवस्ती असलेले  प्रगतशील  गाव आहे. कौळाले गाव येथे पांडव कालीन पुरातन शिव मंदीर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३८६४  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ८, अंगणवाडी केंद्रे ११ व ३ समाज मंदीर आहेत.

 2.  ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, भात, नाचली, वरई, उडीद, तुर ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

 3.  कौलाळे  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कासटवाडी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.

4.  ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व १२ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

2. भौगोलिक स्थान

कौलाळे हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 12 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. ग्रामपंचायतीचे  एकूण क्षेत्रफळ २१४९.९७ हे आर  असून, लागवड क्षेत्र १५३८.०२ हे आर  आहे.   ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण 848  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 3864 आहे. त्यामध्ये 1903 पुरुष  1961 महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत कौलाळे हद्दीत 3 महसुली गावे व १२ पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून 12 km अंतरापर्यंत वसलेले आहेत.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच शिरसगाव (काळशेती) गावालगत धरण आहे. या धरणामध्ये मुबलक प्रमाणात बारमाही साठा असल्यामुळे बारमाही पाणी वाहत असते, पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी, तसेच शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. या धरणाच्या वाहत्या पाण्यामुळे फसणपाडा गावा शेजारी असलेल्या काळमांडवी धबधब्यावर वर्षभर पर्यटक येत असतात,  कौलाळे गाव येथेल  हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १८°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

 3. लोकजीवन

कौलाळे  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून मिरची,काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि कौलाळे गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

कौलाळे  लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

4. संस्कृती परंपरा

कौळाले  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच कौलाळे गाव येथे पुरातन शिवमंदीर हे  जागृत देवस्थान असून येथे महाशिवरात्री निमीत्त ७ दिवस अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन गेल्या अनेक वर्षा पासून केले जाते,  या ७ दिवसामध्ये प्रवचन, कीर्तन, जागर भजन, व पहाटे काकडा भजन केले जाते. या सप्ताहामध्ये एकूण 12 गाव/पाड्यांचा सहभाग असतो व सातही दिवसामध्ये ग्रामस्थ तसेच  दाते  अन्नदान करतात. महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शना  करीता येत राहतात व रोजच येथे शिव भक्तांची वर्दळ असते, सदर शिव मंदीर पुरातन आहे व सदर शिवालयाच्या सभोवती भल्या मोठ्या दगडांचा कोट आजही पहावयास मिळतो. ग्रामपंचायत कौलाळे गाव पैकी टोकरखांड येथे नवरात्र उत्सवा निमीत्त दुर्गा मातेची स्थापना केली,

नवरात्र उत्सवामध्ये  गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

 5.  प्रेक्षणीय स्थळे:-

6.  कौलाळेश्वर शिव मंदीर  – कौळाले  गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला भव्य स्वरूपामध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.  

7.  शिरसगाव (काळशेती) धरण – या  धरणामध्ये मुबलक प्रमाणात बारमाही साठा असल्यामुळे नदी बारमाही पाणी वाहत असते, पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी, तसेच शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो.

8 काळमांडवी धबधबा- ग्रामपंचायत हद्दी पैकी फणसपाडा शेजारी काळमांडवी धबधबा प्रसिद्ध असून  वर्षभर पर्यटक येत असतात..

9. जवळची गावे

ग्रामपंचायत कौलाळे हद्दिच्या लागत नांदगाव, न्याहाळे खुर्द, केळघर, पोन्धीचापाडा,  झाप धोंडपाडा. आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत कौळाले, जव्हार

कौळाले हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील एक गाव आहे. जव्हार तालुका हा प्रामुख्याने आदिवासी बहुल आणि भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भाग आहे. या भागातील विकासाची माहिती खालीलप्रमाणे आहे: जव्हार तालुक्याचा विकास भौगोलिक आणि लोकसंख्या: जव्हार तालुका सह्याद्रीच्या पठारावर वसलेला असून, बहुतांश भाग जंगले आणि डोंगराळ दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्येपैकी बहुतांश (९१.६४%) लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. शेती: भात, नाचणी, वरई ही येथील मुख्य पिके आहेत. तसेच मूग, उडीद, खुरासणी, आणि बागायती पिके जसे की आंबा, काजू यांचीही शेती केली जाते. विकासाची आव्हाने: भौगोलिक अडचणी, वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी, आरोग्य सुविधांची कमतरता आणि कमी साक्षरता दर (५७.४२%) यामुळे जव्हार आणि मोखाडा यांसारख्या तालुक्यांमध्ये विकासाची गती मंदावली आहे. पर्यटन: जव्हारला 'पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर' म्हणूनही ओळखले जाते. निसर्गसौंदर्य, दाट जंगले आणि आल्हाददायक हवामानामुळे येथे पर्यटनाला वाव आहे. प्रसिद्ध वारली चित्रकला हे येथील सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. सरकारी प्रयत्न: पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 'कातवड वाडी' येथे पर्यटन उपक्रमांतर्गत 'जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी'च्या सहकार्याने 'इको-टुरिझम'ला प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये व्हॅली क्रॉसिंग स्ट्रक्चर्स आणि व्ह्यू पॉइंट्स विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. कौळाले गावाविषयी कौळाले हे जव्हार तालुक्यातील एक महसूल गाव आहे. विशिष्ट कौळाले गावाच्या सध्याच्या विकास प्रकल्पांबद्दल स्वतंत्रपणे सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही. मात्र, गावाचा विकास हा प्रामुख्याने जव्हार तालुक्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारी योजना आणि निधीवर अवलंबून आहे. अधिक माहितीसाठी, आपण पालघर जिल्ह्याच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळाला palghar.gov.in भेट देऊ शकता किंवा स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

प्रशासकीय संरचना



भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


848
3864
1903
1961

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo